Monday, November 23, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

घनश्याम अग्रवाल यांच्या हस्ते प्रथम वीट पूजन; बेघर व मानसिक आजारग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 17, 2026
in चोपडा, सामाजिक
0
निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 17 : समाजातील निराधार, बेघर तसेच मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना सुरक्षित निवारा, मायेचा आधार आणि सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘अपनाही घर प्रतिष्ठान’च्या मानव सेवा केंद्राच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. संस्थेच्या जागेवर शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा उद्योजक घनश्याम अग्रवाल यांच्या शुभहस्ते प्रथम वीट पूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

प्रथम विट पूजन करतांना श्री. घनशामभाऊ अग्रवाल

संस्थेच्या नवीन जागेवर यापूर्वीच भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता. आता प्रथम वीट पूजनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष बांधकामाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. समाजातील दुर्लक्षित, निराधार आणि मानसिक आजारामुळे प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या व्यक्तींना सुरक्षित वातावरण, आवश्यक सेवा-सुविधा आणि माणुसकीची ऊब देणारे केंद्र उभारण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

या कार्यक्रमाला वेले येथील माजी उपसरपंच विनोद पाटील, अमर संस्थेचे उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, अपनाही घर प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव सुलोचना पाटील, उपाध्यक्ष कानन पाटील, संचालक विजय पालीवाल, अजय जोहरी, वरद पाटील तसेच संस्था समन्वयक व पत्रकार संदीप ओली आदी मान्यवर उपस्थित होते.

रस्त्यावर, उघड्यावर किंवा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या निराधार व्यक्तींना केवळ निवारा देणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून त्यांना आपलेपणाची जाणीव, सुरक्षितता आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सन्मानाने उभे राहण्याची संधी देणे हा संस्थेचा व्यापक दृष्टिकोन आहे.

 

माणुसकीच्या सेवाकार्याला नवी दिशा
आजच्या काळात निराधार आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधिक संवेदनशील बनला आहे. अशा व्यक्तींना आधार देण्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. ‘अपनाही घर प्रतिष्ठान’च्या माध्यमातून साकारत असलेले हे मानव सेवा केंद्र भविष्यात अनेक गरजू आणि वंचित व्यक्तींसाठी हक्काचा निवारा व आधाराचे ठिकाण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या सेवाकार्यात समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि नागरिकांनीही सहकार्याचा हात पुढे करावा, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे.

 

Views: 131
Previous Post

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

by टीम लोकप्रवाह
November 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 17 : समाजातील निराधार, बेघर तसेच मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना सुरक्षित निवारा, मायेचा आधार आणि सन्मानाने...

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण प्रत्येक कुटुंबाला आनंदाने साजरा करता यावा, या सामाजिक...

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये...

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

by टीम लोकप्रवाह
November 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 04 : समस्त पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाज, जळगाव आणि एन.आर.जी. फाऊंडेशन, गुजरात सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने...

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

by टीम लोकप्रवाह
November 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. 02, जळगाव | जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने सोमवारी...

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us