Sunday, November 22, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा टॅलेंट हंट परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

150 विद्यार्थ्यांना मिळाली आकर्षक बक्षिसे

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 15, 2024
in महाराष्ट्र, चोपडा, शहर विशेष, शिक्षण
0
चोपडा टॅलेंट हंट परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १५ – येथे इयत्ता 1 ली , 4 थी आणि 7 वीच्या विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या चोपडा टॕलेंट हंट (CTH) या स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. तब्बल 1324 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेल्या या परीक्षेतील 150 यशस्वी विद्यार्थ्यांना याप्रसंगी पारितोषिक मिळाले तसेच उर्वरित सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले, कवी विलास पाटील, पवन लाठी, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे, पी व्ही एम इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य रजिश, लोकप्रवाहचे संपादक पत्रकार संदिप ओली आदिंची उपस्थिती होती.
पारितोषिक देतांना पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले व सोबत इतर मान्यवर
चोपडा तालुक्यातील स्टेट बोर्ड तसेच सीबीएसई माध्यमाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थांनी या परीक्षेत सहभाग नोंदविला. चोपडा टॅलेंट हंट आयोजन समितीमार्फत परीक्षेसाठी मोठी आकर्षक बक्षिसे विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना या परीक्षेकडे आकर्षित करणे तसेच या स्पर्धेच्या युगात त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज करणे हा यामागील उद्देश होता. शहरातील आणि तालुक्यातील विविध शाळांमधील 1324 विदयार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदविला होता. यामध्ये एकूण 150 विदयार्थ्यांना आकर्षक बक्षीसे म्हणून सायकल, स्मार्ट वॉच, स्टडी टेबल, रायटिंग पॅड, स्कुल बॅग, ड्रॉइंग किट असे देण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
पारितोषिक देतांना पत्रकार संदिप ओली व सोबत इतर मान्यवर
परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी आयडियल इंग्लिश अकॅडमीचे संचालक पद्माकर पाटील, गुरु क्लासेस संचालक अश्विनी कुमार चौधरी तसेच समर्थ मॅथ्स अँड सायन्स अकॅडमी संचालक घनश्याम पाटील व विशाल मराठे यांनी परिश्रम घेतले. परीक्षेच्या नियोजनबद्ध आयोजनासाठी अनेक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून परिश्रम घेतलेत व आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
पारितोषिक देतांना महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे व सोबत इतर मान्यवर
Views: 485
Previous Post

करिअर निवडतांना प्लॅन बी तयार असू द्यावा – डाॅ. अमित हरताळकर

Next Post

राष्ट्रवादी सोशल मिडीया मेळाव्यासाठी पदाधिकारी मुंबईला रवाना

Next Post
राष्ट्रवादी सोशल मिडीया मेळाव्यासाठी पदाधिकारी मुंबईला रवाना

राष्ट्रवादी सोशल मिडीया मेळाव्यासाठी पदाधिकारी मुंबईला रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

निराधारांना हक्काचा निवारा मिळणार; ‘अपनाही घर’च्या मानवसेवा केंद्राच्या बांधकामाला प्रारंभ!

by टीम लोकप्रवाह
November 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 17 : समाजातील निराधार, बेघर तसेच मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना सुरक्षित निवारा, मायेचा आधार आणि सन्मानाने...

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण प्रत्येक कुटुंबाला आनंदाने साजरा करता यावा, या सामाजिक...

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये...

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

by टीम लोकप्रवाह
November 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 04 : समस्त पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाज, जळगाव आणि एन.आर.जी. फाऊंडेशन, गुजरात सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने...

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

by टीम लोकप्रवाह
November 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. 02, जळगाव | जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने सोमवारी...

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us